Sunday, July 16, 2006

माझ्या मनामध्ये
तुझं तेच मोहक चित्र
आणि नजरेमध्ये तुझ्या
मी म्हणजे फक्त मित्र ?

पुन्हा एकदा तेच प्रेम
पुन्हा एकदा तीच जाणीव
भरलेल्या या घनात माझ्या
फक्त एक तुझीच उणीव

एकदाच माझी म्हणवून घे
एकदाच माझी होऊन ये
मग खुशाल माझे प्राण घे
(पण त्याआधी)
हृदय माझं परत दे
हृदय माझं परत दे...
मी प्रेम तुझ्यावर केलं,
तुला मनापासून आपलं समजून.
पणं तु तर मला म्हणालीसं,
तू मला विसर एक स्वप्न समजूनं.

तिचं ते बोलणे जणू,
पौर्णिमा रात्रीचा चंद्र.
आणि तिचे माझ्यासोबत असणे जणू,
आमवस्या रात्रीचा असलेला चंद्र.

मी तर तुझाच होतो,
तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होतो.
पण मला काय माहीत मी तुझ्या स्वार्थाच्या डोहात,
डोळे बंद करुन डुंबत होतो.
सुकलेली फुलं...
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन तिच्याकड
नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग "LET US C" त फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं....
कुणास ठाऊक?................................
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

Saturday, July 15, 2006

आठवतात मला अजुनहि ते दिवस,
जेव्हा आपलं काही तरी नातं होतं!
त्या नात्याल्या कहीही नावं न्हवतं,
पण आपल्या दोघांनाही ते मान्य होतं!
आठवतात मला आजुनहि ते दिवस,
तुझं ते निखळ हसणं,
अति आनंदाने दोळ्यात अश्रु आणणं!
मी रागव्ल्यावर मझ्यावर रुसुन बसणं
आठवतोय मला आजही तो दिवस,
आयुश्याच्या वाटेवर मला एकटं टाकलस!
आपल्या नात्यातला हा ही निर्णय,
तु एकटीनेच घेतलास!
पण आयुश्यात एकच दुःख राहील,
तु असं का केलस? तु असं का केलस?
अशी माझी कोणती चूक होती,
जी तु मला सांगु शकली नाहीस?
असा माझा कोणता गुन्हा होता,
जो तु कधीच माफ़ करु शकली नाहीस!