Wednesday, November 01, 2006

तुझी सोबत असल्यावर
दिवस सरुन जातो नकळत,
तुझ्या दुराव्यात मनाचा कप्पा
आठवांनी भरुन जातो नकळत.
फ़क्त तुझ्या नसण्याने
मी अस्थिर होतो नकळत,
कधी संपेल ही सांज,ही रात्र
असा,मी अधिर होतो नकळत.
नकळतचं घडते सारे
श्वास अड्खळतात नकळत,
ह्रदयातले ध्यास माझ्या
धडधडतात माझ्या नकळत...

Sunday, July 16, 2006

माझ्या मनामध्ये
तुझं तेच मोहक चित्र
आणि नजरेमध्ये तुझ्या
मी म्हणजे फक्त मित्र ?

पुन्हा एकदा तेच प्रेम
पुन्हा एकदा तीच जाणीव
भरलेल्या या घनात माझ्या
फक्त एक तुझीच उणीव

एकदाच माझी म्हणवून घे
एकदाच माझी होऊन ये
मग खुशाल माझे प्राण घे
(पण त्याआधी)
हृदय माझं परत दे
हृदय माझं परत दे...
मी प्रेम तुझ्यावर केलं,
तुला मनापासून आपलं समजून.
पणं तु तर मला म्हणालीसं,
तू मला विसर एक स्वप्न समजूनं.

तिचं ते बोलणे जणू,
पौर्णिमा रात्रीचा चंद्र.
आणि तिचे माझ्यासोबत असणे जणू,
आमवस्या रात्रीचा असलेला चंद्र.

मी तर तुझाच होतो,
तुझ्यावर जीवापाड प्रेम करत होतो.
पण मला काय माहीत मी तुझ्या स्वार्थाच्या डोहात,
डोळे बंद करुन डुंबत होतो.
सुकलेली फुलं...
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन तिच्याकड
नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग "LET US C" त फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं....
कुणास ठाऊक?................................
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

Saturday, July 15, 2006

आठवतात मला अजुनहि ते दिवस,
जेव्हा आपलं काही तरी नातं होतं!
त्या नात्याल्या कहीही नावं न्हवतं,
पण आपल्या दोघांनाही ते मान्य होतं!
आठवतात मला आजुनहि ते दिवस,
तुझं ते निखळ हसणं,
अति आनंदाने दोळ्यात अश्रु आणणं!
मी रागव्ल्यावर मझ्यावर रुसुन बसणं
आठवतोय मला आजही तो दिवस,
आयुश्याच्या वाटेवर मला एकटं टाकलस!
आपल्या नात्यातला हा ही निर्णय,
तु एकटीनेच घेतलास!
पण आयुश्यात एकच दुःख राहील,
तु असं का केलस? तु असं का केलस?
अशी माझी कोणती चूक होती,
जी तु मला सांगु शकली नाहीस?
असा माझा कोणता गुन्हा होता,
जो तु कधीच माफ़ करु शकली नाहीस!

Thursday, June 29, 2006

काहीतरी मागु म्हणतेस..
एक रडण्याची जागा देशील?
मी जेव्हा पाऊस होइन..
तू भिजायला येशील?

हळुवार मन परस्परांच जाणून घ्यायचं असतं..
दोघांनी मिळून एकच सुंदर स्वप्न पाहायचं असतं..
"अखंड साथ देइन" वचन द्यायचं घ्यायचं असतं..
आपलं म्हणुन राखून काहीच ठेवायचं नसतं......

एकदा वाटतं,
वाळकं पान व्हावं,...
वार्‍याबरोबर भिरभिरत
तुझ्याजवळ यावं.........

एकदा आशीच एक कळी
वार्‍यासवेत आलगद आली
मला काहीही ना विचारता
र्‍ह्दय काढुन घेउन गेली
नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास,
सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे,
तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?
मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडया मनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता
मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,
नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?
फोन मात्र मीच करायचं, H.....R... U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?
उगीचच म्हणतात
प्रेम म्हणजे आकाश,
प्रेम म्हणजे धरती,
प्रेम म्हणजे सागर,
प्रेम म्हणजे रत्नांचा आगर...
प्रेम म्हणजे यापैकी काहीच नाही
प्रेम म्हणजे फक्त एक अश्रू...
डोळ्यातुन गालावर ओघळलेला
आणि कोणीही न टिपलेला.........

Saturday, June 17, 2006

खरंच प्रेम असं असतं?
तुझी आठवण, तुझा भास,
प्रत्येक श्वासागणिक... फक्त तुझाच ध्यास...
आपली भेट होईलच हा विश्वास...
खरंच प्रेम असं असतं?
तू समोर असताना,
काहीच न बोलणं...
एकांतात मात्र, मनातल्या तुझ्याशी,
तास न तास गप्पा मारण...
खरंच प्रेम असं असतं?
हातात हात घेऊन...
प्रेमाच्या आणा-भाका घेणं...
एकमेकाचे व्यक्त - अव्यक्त विचार समजून घेणं,
स्वतः इतकाच तुझ्यावर विश्वास असणं...
खरंच प्रेम असं असतं?
निःस्वार्थ, निरपेक्ष प्रेम हे एक सुंदर स्वप्न असतं,
खरंच प्रेम असंच असतं...
स्वप्नातही ते एक सुंदर सत्य असतं...
पहिल्याच भेटीत कळले होतेपुढे जाण्यात अर्थ नाही.
तरी त्या 'अचानक' भेटीकशा नियमाने घडल्या, नाही?

प्रेमाच्या त्रिकोणात, बहुतेक माझीच बाजू तुटकी होती,
नाहीतर माझी प्रेमाची हाक तुझ्यापर्यंत का पोहोचत नव्हती?
पैशाने सगळे खरेदी करता येते म्हणतात, मग प्रेमाचाच का असा अपवाद सोडतात
तुझ्यासाठी धडधडणाऱ्या हृदयाला, सगळेच का असे वेडा म्हणतात ?

किती काळ वाट पहायचि वाटल येशील तू धाऊन ह्रिदयीच्या हाकेला,
सर्वच कस बोलुन दखवायच, डोळ्यान्ची भाषा तूला नको का समजायला.
थोडंसं आवरून
थोडंसं सावरून
आरशापुढं उभी रहा
आणि मग सांग
तुझं माझ्यावर प्रेम आहे का ?

तुझ्या काळ्या केसांकडे पाहू नकोस
तुझ्या गोऱ्या गालांकडे पाहू नकोस
मिचमिचणाऱ्या पापण्यांकडे पाहू नकोस
थरथरणाऱ्या ओठांकडे पाहू नकोस
साऱ्या जगाचं गुपीत सांगणाऱ्या-
तुझ्या डोळ्यांमध्ये बघ
आणि मग सांग
ते आता तुझे राहिलेत का ?

खिडकी पटकन बन्द करून घे
माझी शिटी ऐकू आल्यावर
स्वतःशीच काही तरी बोलून बघ
आणि मग सांग
तुझा तरी आवाज तुला ऐकू येतो का ?

डोळे घट्ट मिटून घे
मी समोर दिसल्यावर
प्रतिमा तयार होईलच माझी
पापण्यांच्या आतल्या बाजूला
ती बन्द डोळ्यांनीच पहा
अगदी नाहीशी होईपर्यन्त .... झाल्यावरही....
आणि मग सांग
मी तुला आवडतो का ?

carrom खेळायला बैस
कुणाच्याही समोर
हात वरपर्यन्त ने
striker सोडल्यावर
तो सावकाश खाली येईल
आता मला सांग
मी तुला आठवतो का ?

पत्ते खेळायला बैस
कुणाशीही
गोटूवर राजा पडेल
तू विचार गोटू कुणाचा ?
सगळे हसतील
तू ही करच हसल्यासारखं
आणि मग सांग
तुला हसू आलं का ?

घरी ये माझ्या
मी दिसणार नाही कुठंच
तू विचार '
prem.... कुठंय'?
कुणीच काही बोलणार नाही
ही कविता तुझ्या हाती देतील
ती तशीच घरी घेऊन जा
वाच...
आणि मग मला सांग
तुझं माझ्यावर प्रेम आहे का ?
तुला हसताना पाहून
मला आनंद होणं,
तू उदास असतांना,
मन व्यथित होणं...

तुझी प्रत्येक गोष्ट
लक्षात ठेवण,
अगदी लहान लहान गोष्टींवरून,
तुझी आठवण काढण...

मनातले सगळे विचार
फक्त तुला सांगणं,
तू बोलत असतांना
तुझा भावपूर्ण चेहरा बघत राहणं...

कारण नसताना तुझ्याशी भांडण,
तू रागावली की,
“अग, हक्काच्या माणसाशीच भांडतो ना आपण...”
अशी समजूत घालणं...

तुला आवडेल ते करण्याची तयारी असणं,
स्वतः: इतकाच तुझ्यावर विश्वास असणं,
तू नेहमी खूश असावी
हेच एक स्वप्न असणं...
तुझ्याइतकंच ह्या स्वप्नाला जपणं...
खरंच, ह्यालाच तर प्रेम म्हणत नसतील ना ?
जीवनातल्या ह्या वळणावर स्मरण मला का तुझेच
व्हावे
मनात हसु असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे
आहे सारे मनोहर तरी
मनी हि का खंत असावी
यशाच्या ह्या शिखरावर तू माझ्या का सांगाती नसावी
सारे
विश्वच माझ्या चरणी असावे
पण माझ्या ह्या विश्वात तूच नसावे
प्रियतमे मजवर
तू इतुके का रुसावे
माझ्या ह्या यशाकडे का एकदाही न पहावे
जीवनातल्या ह्या
वळणावर स्मरण मला का तुझेच व्हावे
मनात हसु असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे
जगत्-नियंती नियती हि का एवढी क्रूर असावी
तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची का
तिला पारख नसावी
तुझ्याविना मी का एकट्याने कुढत जगावे
तुझ्या आठवणींनाच का
जीवन समजावे
तुला काळाने का इतके ऊंच न्यावे
मला तुझे का दर्शनही दुर्लभ
व्हावे
जीवनातल्या ह्या वळणावर स्मरण मला का तुझेच व्हावे
मनात हसु
असतांनाही नयनी पाणी का तरारून जावे
मधूनच तुझा आवाज ऐकू येतो,

तुझे शब्द जसेच्या तसे आठवतात -

तुझ्या आवडीचे काही दिसले,

की डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.

कधी रिमझीम धारा झरते, कधी अनावर वादळ कोसळते

कधी अस्फुट हसू उमटते, तर कधी ओलेचिंब डोळे उमलतात...
ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही...
यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही.....
यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही....!
तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!
म्हणूनच, हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत...
आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत...
यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत...
ही अखेरची तुझी आठवण...
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही...!
कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...
हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??
तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!

की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...
ह्या खांद्यावर डोकं ठेवून
तिला रडावसं वाटावं
काँलेजनंतर मागे थांबून
सोबत बसावसं वाटावं
ज्या स्वप्नांमधे माझ्या
सगळ्या रात्री जागतात
त्या स्वप्नांमधे हरवून
तिलाही जागावसं वाटावं
माझे आसू पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!
छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं
पण, भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा
पडेलच विसर तेव्हा
तिनं माझ्या प्रेमात
अगदी आकंठ बुडावं
ह्या छोट्याश्या स्वप्नानं
एकदाच खरं व्हावं
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं!
फ़क्त एकदाच......
फ़क्त एकदाच………….
तुला मनसोक्त हसताना पाहायचयं,
निदान त्यासाठी तरी मला विदुषक बनून तुझ्यासमोर यायचयं.
फ़क्त एकदाच…………..
तुझ्या मनातलं सारं काही जाणून घ्यायचयं,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवून तासनतास बसायचयं.
फ़क्त एकदाच…………
तुझ्या मऊशार केसांतून हळूवार हात फ़िरवायचायं,
निदान त्यासाठी तरी एखादा गजरा तुझ्या केसांत घालायचायं.
फ़क्त एकदाच…………..
तुला माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचयं,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं ऊशिरा यायचयं.
फ़क्त एकदाच………….
तुला अनिवार रडताना पाहायचयं,
निदान त्यासाठी तरी मला खोटंखोटं मरायचयं......
फ़क्त एकदाच…………..
तुझ्यातलं ते खरं स्नेह अनुभवायचयं,
निदान त्यासाठी तरी एकदा मला तुझं व्हायचयं.

खरंच करशील मला आपलसं ?
फ़क्त एकदाच…………..
नमस्कार मित्रान्नो,
ह्या कविता...
काही माझ्या ...
तर काही मला मनापासुन आवडलेल्या...
तुझ्या केसांत गुंतले काही क्षण
तुझ्या डोळ्यांत थबकले काही क्षण
तुझ्या पापण्यांत भिजले काही क्षण
तुझ्या गालांवर फुलले काही क्षण
तुझ्या खांद्यावर विसवले काही क्षण
तुझ्या बाहूंत लपले काही क्षण
तुझ्या ओठांत हसले काही क्षण
तुझ्या मिठीत भिनले काही क्षण
तुझ्या पदरात अडकले काही क्षण
तुझ्या आठवणीत विसरले काही क्षण
आयुष्यात काही लोक असे येतात घेत काही नाही
पण खूप काही देऊन जातात
सोबतीला खूप साऱ्या आठवणीही देतात
ज्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव पिंगा घालतात
ज्यांच्या आठवणीने मन खूप हुरहुरते
दूर सगळ्यांपासून आठवणीतच रमते
नुसत्या आठवणीने मनात काहूर माजते
त्या व्यक्ती परत परत भेटाव्या सारखे वाटते
जे कधीतरीच शक्य होते
काही वेळेस तर अशक्यच असते
अशा वेळी आठवणींनाच जपायचे असते
मनाच्या खोलवर कुठेतरी दडवायचे असते
मधूनच कधी तरी त्यांच्यात परत रमायचे असते.
आला आला म्हणतानानिघून गेला पावसाळा...!भेट त्या दिसाचीसांगून गेला पावसाळा...!!
जरासाही भरला नाहीरिता कोपरा मनाचा...नुसताच शिडकावाघालून गेला पावसाळा...!!
कोणते कारण आहे..टाळणारे पावसाळा..?आठवणीत मजलाजाळून गेला पावसाळा...!!
कुणास लाभला दिलासाअशा या पावसाने..आसवांच्या मुंडावळ्या मजबांधून गेला पावसाळा...!!
जखमेवरच्या खपल्याकाढून गेला पावसाळा...दुश्मनासारखा माझ्याशीवागून गेला पावसाळा...!!
पाहिलेत आजवरी मीकित्त्येक पावसाळे..प्राण माझे माझ्याशी हामागून गेला पावसाळा...!!
this is blog for all poets ...n premis..