Wednesday, November 01, 2006

तुझी सोबत असल्यावर
दिवस सरुन जातो नकळत,
तुझ्या दुराव्यात मनाचा कप्पा
आठवांनी भरुन जातो नकळत.
फ़क्त तुझ्या नसण्याने
मी अस्थिर होतो नकळत,
कधी संपेल ही सांज,ही रात्र
असा,मी अधिर होतो नकळत.
नकळतचं घडते सारे
श्वास अड्खळतात नकळत,
ह्रदयातले ध्यास माझ्या
धडधडतात माझ्या नकळत...

2 comments:

Unknown said...

its really nice .. very good collection

Anonymous said...

Best Friend Keep it up.........